धाराशिव जिल्ह्याचे भूमीपुत्र तथा भाजपाचे मा. प्रदेश सरचिटणीस विधान परिषदेचे माजी सदस्य मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांना आज मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी मुंबईतील विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा विधान परिषदेतील प्रभावशाली भाषणाबद्दल उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री ना. चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे विधान परिषदेच्या सभापती ना. निलमताई गो-हे विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवळ आदींच्या उपस्थितीत माजी आमदार ठाकूर यांना सन २०१८-१९ करिता महाराष्ट्र विधान परिषद ‘ उत्कृष्ट भाषण ‘ पुरस्कार महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी विधीमंडळातील आमदार व विधिमंडळ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्याच्या विविध प्रलंबित विकासाचे प्रश्न विधान परिषद सदस्य म्हणून विधिमंडळ सभागृहामध्ये मांडले होते. त्यामध्ये मराठवाड्याच्या व धाराशिव जिल्ह्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी, राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास, औद्योगिक व पर्यटन विकास, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्वतंत्र विद्यापीठ, सिंचन, पायाभूत सुविधा आदिसह विविध जिव्हाळ्याचे विषय व प्रश्न माजी आमदार ठाकूर यांनी विधीमंडळ सभागृहात मांडले होते. माजी आमदार ठाकूर यांना हा पुरस्कार प्रदान समारंभास धाराशिव भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य – पाटील, सुखदेव टोंपे, अँड. जहीर चौधरी समरजितसिंह ठाकूर सुजित परदेशी, गुलचंद व्यवहारे, आदिसह धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित होते .
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.