परांडा (प्रतिनिधी) आंध्रप्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडू यांचे सरकार सत्तेवर आले आहे.सरकार सत्तेवर येतात त्यांनी दिव्यांगाना बांधवांना प्रति महिना 6000 (सहा हजार) रुपये पेन्शन लागू करण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांची अनेक वर्षापासून ची मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले याचे सर्व दिव्यांग बांधवांनी स्वागत केले. परंतु आंध्र प्रदेशांमध्ये दिव्यांगाना चांगले दिवस आले आहेत महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना हे दिवस कधी पहावयास मिळणार अशी चर्चा महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवामध्ये सुरू आहे राज्यातील दिव्यांग बांधवांना प्रति महिना 1500 अनुदान सुरू आहे हे अनुदान मिळण्यासही कायम धरसोड होत आहे काही वेळा हे अनुदान चार महिन्यातून एकदा येते राज्यात दिव्यांग बांधवासाठी स्वतंत्र मंत्रालयाची नेमणूक करण्यात आली आहे या विभागामार्फत दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना राबविल्या जातात परंतु या योजना राबवीत असताना अथवा पदरात पाडून घेताना दिव्यांग बांधवांची कसोटी लागत असते. आंध्रप्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या सरकार सत्तेवर आले त्यांनी निवडणुकीपूर्वी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये इतकी पेन्शन देण्याचे घोषित केले होते सरकार सत्तेवर येतात त्यांनी दिव्यांग बांधवांना एनटीआर भरोसा पेन्शन योजना लागू केली असून त्यांना प्रतिमा 6000 रुपये पेन्शन देण्यास सुरुवात केली आहे या योजनेची सुरुवात आंध्र प्रदेश मध्ये होताच राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी सरकारचे अभिनंदन केले तसेच दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने आंध्रप्रदेश सरकार यांचे आभार मानण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी आपले आभाराचे पत्र ई-मेलद्वारे आंध्र प्रदेशचे सरकार यांना पाठवले दिव्यांग बांधवाकडे बघण्याचा या सरकारच्या दृष्टिकोन नक्कीच व वाखाडण्यासारखा असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे आता राज्यातील दिव्यांग बांधवांनी ची नजर दिव्यांग पेन्शन वाढीकडे आहे असे दिव्यांग तानाजी घोडके यांनी व्यक्त केले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.