परंडा : शहरातील भवानी शंकर मंदिर, गारभवानी मंदिर, भगवती मंदिर, रेणुकामाता मंदिर, तालुक्यातील सिरसाव येथील महालक्ष्मी मंदिर, डोंजा येथील रेणुकामाता मंदिर, हिंगणगाव (बु.) येथील यमाईदेवी मंदिर येथे घटस्थापना तर विविध नवरात्रोत्सव मंडळांनी देवी मूर्ती प्रतिष्ठापना करून घट स्थापना केली आहे. तालुक्यात विविध ठिकाणी नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली आहे. पोर्णिमेपर्यंत (दि. १७) परंपरेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शहरातील श्री भवानी शंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. ३) स. ११ वा. घटस्थापना करण्यात आली. सोमवारी (दि.७) ४० वर्षापासूनचा परंपरागत कुंकुमार्चन कार्यक्रम होणार आहे. यावेळी देवीच्या १ हजार नावांचे उच्चारण करून देवीस कुंकु वाहण्यात येणार आहे. या धर्मिक विधिमुळे सौभाग्यवृद्धीचा लाभ मिळतो. दि. ११ रोजी स. ९ ते १२ या वेळेत वैदिक हवन संपन्न होणार आहे. पुण्याहवाचन व सप्तशती पठण केल्यानंतर उत्साहात दु. १२.१५ वाजेपर्यंत कुष्मांडबली, पुणाहुती होणार आहे. हवन कुंडात नारळ अर्पण करणे, सुकृत पुण्याई तर पुणाहुती पात्रास स्पर्श करणे अत्यंत पवित्र कर्म मानले जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. १२) विजयादशमी निमित्त सायंकाळी ५. ३५ ते रात्री १० वाजेपर्यंत आपट्याची पाने लुटत सिमोल्लंघन करून आईवडीलांसह वडिलधारी मंडळी व गुरुजनांचा आशिर्वाद घेणे पुण्यकर्म मानले जाते. यानंतर रा.११ वा. देविजींच्या श्रमनिद्रेस सुरूवात होईल. गुरूवारी (दि. १७) पहाटे ५ वा. निद्राजागृती नंतर पूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त ज्योतिष प्रविण पं. किशोर बैरागी यांनी दिली. दररोज दु. ४ ते ६.३० वाजेपर्यंत ६९ वर्षाच्या परंपरेनुसार हंसराज महिला भजनी मंडळाकडून भजनसेवा सुरु आहे. देविदर्शनासाठी पहाटे ५.३० ते दु. ३. वाजेपर्यंत व दु. ३.३० ते रा. १० वाजेपर्यंत तर दि. ११ रोजी अष्टमीदिवशी १६ तास मंदिर खुले राहणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading