परंडा (दिनांक २४) परंडा तालुक्याला वादळी पाऊस व वाऱ्याचा फटका बसला असून वादळे वाऱ्याच्या थैमान मुळे परंडा शहराच्या परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परंडा ग्रामीण, परंडा शहर, भोत्रा, डोमगाव ,कुक्कडगाव, रत्नापुर ,मलकापूर, आनाळा, जेकटेवाडी, या परिसरातील गावांना काळीने झुडपले असून वीज पडून चार जनावरे दगावले आहेत तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडल्याने संसार उघड्यावर पडलेला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्ता खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे.
यामध्ये रत्नापूर येथील शेतकरी कचरू दसरा हरणावळ मुख्यमंत्री कृषी सर्प या योजनेअंतर्गत यांच्या गट क्रमांक 26 मधील विहिरीवर 2020 मध्ये शक्ती कंपनीचे तीन एचपी चे सर्व ऊर्जा बसवले होते परंतु दिनांक 20 मे च्या वादळी वाऱ्याने मॅनेजर नुकसान झाले आहे हे पॅनेल पूर्णपणे तुटले असून पॅनल वाऱ्याने उडून दूरवर पडले आहेत तर सौर चे पूर्ण स्ट्रक्चर उघडून पडले आहेत यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेल्या असून या सहपरिंडा शहरातील शंकर दासराव भाग्यवंत कुर्डूवाडी रोड शिक्षक सोसायटी समोर यांच्या घराचे खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून घरावरील पत्रे व छप्पर उडून गेलेले आहेत तसेच कुर्डूवाडी रोडवरील सुजाउद्दीन उर्फ बबलू मुजावर यांच्या गॅरेजचे समोरील व दुकानाचे पत्र्याचे शेड सगळे उकडून पडलेले आहेत तसेच श्री धनंजय मेघराज साठे यांच्याही दुकानाचे व पत्र्याचे शेड उकडून व वाऱ्याने छप्पर उडून गेलेले आहेत या परंडा तालुक्यात वादळी वाऱ्याच्या थैमान मुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून तात्काळ मदत मिळावी व उघड्यावर पडलेला संसार पुरवावत व्हावा, याकरिता शासनाकडून तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे वतीने होत आहे, सर्व पंचनामे करण्यात आले आहेत.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परंडा शहर अध्यक्ष नवनाथ कसबे तहसील कार्यालय परंडा महसूल प्रशासनाचे श्री गुलमिरे
व श्री गोफणे यांच्यासह नुकसान झालेले कुटुंब प्रमुख व शेतकरी श्री शंकर दासराव भाग्यवंत, सजाउद्दीन उर्फ बबलू मुजावर धनंजय मेघराज साठे, इरफान हं रे सलीम मुस्तफा पठाण इत्यादी उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading