परंडा प्रतिनिधी : परंडा तालुक्यातील जेकटेवाडी व देवगाव (बु) या गावासाठी आंबी ते जेकटेवाडी जाणाऱ्या ३३ केव्ही मेन लाईनची देखभाल दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि तसेच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याबाबत महावितरण विद्युत कंपनी परंडाचे आस्थापना लिपिक विवेक कुलकर्णी यांच्याकडे देवगाव (बु) येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे तसेच त्यांनी निवदेनामध्ये म्हटले आहे की , आंबी ते जेकटेवाडी या ३३ केव्ही मेन लाईनची देखभाल दुरुस्ती करून जो वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गोसावीवाडी,देवगाव ( बु ) ,जेकटेवाडी, येथील नागरिकांना मागील आठ दिवसा पासून जनावरांना पिण्यासाठी पाणी व गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच देवगाव ( बु ) येथे चार हातपंप असून ते पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहेत.त्यामुळे येथील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी हे विद्युत मोटारी द्वारे मिळत आहे. पण वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. याचा परिणाम गावातील जेष्ठ नागरिक व लहान मुलांना रात्र रात्र लाईट नसल्यामुळे महावितरण च्या या गलथान कारभारच नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याकामी नागरिकांनी संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता पाथरूड ता भूम येथील कनिष्ठ अभियंता कोकाटे व आनाळा येथील कनिष्ठ अभियंता बळीराम नागरगोजे हे दोघे हि नागरिकांना उडवाउडवी ची उत्तरे देतात.तरी या कामी महावितरण च्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून लवकरात लवकर मेन लाईन चे काम पूर्ववत करून येथील वारंवार खंडित होणाऱ्या समस्याचे निराकरण करावे हि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. सदरील निवेदनावर युवा नेते दत्तात्रय ठाकरे, सुहास कदम, तुषार कदम , पत्रकार रावसाहेब काळे , अविनाश कदम , दादा ठाकरे , विष्णु हेंगाडे , सचिन आरे , संतोष कदम , अनिल अत्रे , नवनाथ राऊत , विशाल घाडगे, प्रदीप मुसळे, मयुर शिंदे, नवनाथ शिंदे , योगेश रणखांब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading