परंडा दि २५ : – राज्यमार्ग क्रमांक ११७ चे काम प्रगती पथावर असून सदरील काम म्हणजे बिनापाण्याची खरडपट्टी प्रगती पथावर आहे . परंडा शहरातील २ . १ कि मी सिमेंट कॉन्क्रेट रोड बिना पाण्याचा सुरु असून काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे . सार्वजनिक बांधकाम खाते मात्र झोपलेले दिसते . बेड कॉन्क्रेटचे काम सुरू असून त्यावर पाणीच मारलेले नसल्याने खालचा लेअर असा केला तर सदरील रोडची लवकरच उदासवाडी होणार त्यामुळे शासनाच्या निजोरीवर भूरदंड पडणार आहे . ठेकेदार व बांधकाम खाते यांची मिलीभगत स्पष्ट दिसत असून होत असलेले निकृष्ठ दर्जाचे काम तात्काळ स्थगित होणे आवश्यक आहे . बांधकाम खाते व ठेकेदार शासनाची निव्वळ फसवणूक करून काम सुरू असल्याचे चित्र आहे .
वारदवाडी फाटा ते परंडा शहर करमाळा सोनारी चौक पर्यंत चे १५ कि.मी. चा राज्यमार्ग अंदाजे ४५ कोटीचा असल्याचे समजते . त्यातील २ .१ कि . मी . परंडा शहरातून जाणारा सिमेंट कॉन्क्रेट रोड यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा वास येत आहे . सदरील कामाची तज्ञ अभियंता मार्फत चौकशी करून संबंधीतावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे तो पर्यंत सदरील काम शासनाच्या हितासाठी स्थगित करावे अन्यका शासनाची मोठीच फसवणूक होणार असे चित्र आहे .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.