परंडा (माझं गांव माझं शहर) राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती आहे. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती असून दोन अज्ञात इसमाने दुचाकी वर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षकाकडून करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले असता तेथे तक्रार देण्यात आले आहे. गोळीबार कोणी केला हे माहीत नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह अन्य नेते उद्या 14 सप्टेंबर रोजी परांडा येथे येत असून त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे दोन दिवसापूर्वी पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता त्या दृष्टीने संशय व्यक्त केला जात आहे एका आंदोलनाकडे बंदूक होती पोलीस सुरक्षा रक्षक असताना आंदोलक पालकमंत्री यांच्या जवळ आला होता उद्धव ठाकरे गट शरद पवार गटाचे कार्यकर्ते व सावंत गटाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली होती त्यावेळी तेथे धनंजय सावंत हे उपस्थित होते गोळीबाराला या वादाची किनार आहे याचा पोलीस तपास सुरू आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading