प्रतिनिध(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील प्रगतीशील व उपक्रमशिल शेतकरी श्री गोकुळ वासुदेव हिवरे व त्यांच्या पत्नी सौ राजश्री गोकुळ हिवरे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील मानाचा असणारा उधान पंडित पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल मा श्री सी पी राधाकृष्णन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार कृषी मंत्री श्री धनजंय मुंढे राज्याच्या कृषी सचिव डॉ जयश्री भोज कृर्षी आयुक्त श्री डॉ रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते मुंबई मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हिवरे दांपत्याने अंत्यत प्रतीकुल परिस्थीवर मात करत आपल्या शेतीमध्ये आधुनुकी तंत्राचा व यंत्राचा वापर करुण शेती मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली यातूनच त्यांनी भाजीपाला व फळांच्या रोपाची नर्सरी चालु करुण राज्यासह पर राज्यात देखील त्यांनी दर्जेदार रोपांचा पुरवठा इतर शेतकऱ्यांना केला यातूनच त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली नंतर त्यांच्या रोपवाटीकेत तयार करण्यात आलेले पपईची व इतर भाजीपाल्यांची रोपे अत्यंत दर्जेदार व रोगमुक्त असल्यांने त्यांच्या रोपवाटीकेतील रोपाना राज्यासह परराज्यात देखील मोठी मागणी आहे. त्यातूनच त्यांनी आपल्या पडीक जमीनीचा वापर करुण शेततळे खादले व ते पावसाळ्यात पाण्याने भरुण उन्हाळ्यात याच शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचा सोर्स उपलब्ध केला आणि याच पाण्याचा वापर करुण आपल्या शेतीमध्ये दाळींब,पपई, शेवगा,सिताफळ, पेरू, केळी या नगदी पिकांची लागवड करुण मोठ्या प्रामाणात उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे ते आपल्या शेतातील पिकांना जास्तीत जास्त रासायनिक खतान एवेजी सेंद्रीय व जैविक खतांचा वापर करतात व शेन खत देखील मोठ्या प्रमाणात वापरतात या सर्व गोष्टी मुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असुन आर्थिक सुबत्ता आली आहे. श्री गोकुळ हिवरे व त्यांच्या पत्नी सौ राजश्री हिवरे या सतत आपल्या शेतामध्ये नव नविन पीकप्रयोग करत असतात या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना या अगोदर महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आता त्यांना दि 29 -9 – 24 रोजी सन 2021 चा कृषी क्षेत्रातील मानाचा असणाऱ्या उधान पडींत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हिवरे यांना हा पुरस्कार मिळाल्यांने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या पुस्कार वितरण समारंभ प्रसंगी विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते….


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading