परंडा दि. (प्रतिनिधी) : भूम – परंडा – वाशी विधानसभा मतदार संघातील रहीवासी असलेले व मुंबई, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश
इत्यादि ठिकाणी यांनी मोफत रुग्णसेवा राबवणाऱ्या डॉ. राहुल घुले यांनी आमदारकीच्या आखाड्यात लंगोट लावला त्यांच्या लंगोटाने प्रस्थापित नेत्यासह राज्याचे आरोग्य मंत्री सावंत याची दमच्या होणार असल्याचे दिसते आहे. डॉ. राहुल घुले यांनी आपल्या जन्म भूमीच्या भागातही आरोग्य सेवा देण्याचा विडा उचलला असून त्यांचे मोलाचे कार्य या मतदार संघात दिसत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. सत्तेत राहून तमाम जनतेची सेवा अधिकाधिक करता येईल या उद्देशाने डॉ. राहूल घुले यांनी विधान सभेच्या निवडणुकीत लंगोट लावला आहे. खेडोपाडी त्यांचे नाव, आणि कार्य प्रसिद्ध आहेच, त्यामुळे त्यांच्या मागे मतदार ठामपणे उभा राहील अशी परस्थितीआहे. डॉ घुले यांचा निवडणूक अर्ज वैध झाल्यापासून त्यांच्या चाहत्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. डॉ. घुले भूम परंडा वाशी मतदारसंघाचे आरोग्य सुधारण्यासाठी आमदारकीची निवडणूक लढवीत आहेत.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading