परंडा : परंडा तालक्यात सोमवार दि 23 रोजी सकल धनगर समाज जमातिच्या वतीने परंडा येथील शिवाजी चौक येथे धनगर जमातीच्या अनुसूचित जमतीच्या आरक्षण अंमलबजावणी बाबत रास्ता रोको करण्यात आला महाराष्ट्रातील धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे. 1956 साली अनुसूचित जमातीच्या (SC/ST) यादीत ‘धनगड’ नावाची जमात दाखल करण्यात आली. यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे. ‘धनगड’ नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक चडली आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की, ‘धनगड जमात अस्तित्वात नाही. मात्र ‘धनगर’ जमात अस्तित्वात आहे. त्यामुळे, धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे.धनगड’ नावाची जमात 1956 मध्ये आणि त्याआधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती. परंतु ‘धनगर जमात अस्तित्वात होती आणि आहे. त्यामुळे, ‘धनगड’ च्या जागी ‘धनगर’ जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम 342(1) नुसार आवश्यक आहे.
पंढरपूर आणि लातूर येथे मागील 12 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून, महाराष्ट्रातील धनगर जमातवांधवांच्या भावना तीव्र आहेत. पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते.
आत्तापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बन्याच वेळा दिशाभूल केली असल्याने जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळकाढूपणा तर करत नाही ना अश्या भावना येऊ लागल्या आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.