धाराशिव (परंडा) दि.११ धाराशिव जिल्ह्यातील परांडा 243 विधानसभा मतदारसंघ मध्ये विकासाचे मुद्दे व केलेल्या कामाचे मुद्दे घेऊन सध्या लोकप्रतिनिधी जनतेसमोर येत आहेत. परंतु सद्यस्थिती आपण जर पाहिलं तर गेले पंधरा वर्षे राजकीय सत्ता भोगणारे आमदार राहुल मोटे हे आहेत व सध्या पाच वर्षे सत्ते मध्ये असणारे आमदार तानाजी सावंत हे आहेत विकासाचे मुद्दे घेऊन सध्या विविध राजकीय पक्षाचे उमेदवार फिरत आहेत पण परांडा तालुक्यात तसा विकास झालेला नाही सत्तेच्या सारीपटामध्ये आपण जर पाहिलं तर सावंत आणि मोटे यांना पर्याय नाही म्हणून जनता नेहमी झुकते माप देत आलेले आहे. भूम परांडा वाशी विधानसभा मध्ये जनतेने राहुल मोटे यांची पण आमदारकी पाहिली व सध्या पाच वर्षे झालं सावंत पण यांची आमदारकी जनता पाहत आहे. २४३ विधानसभा तालुक्यांच्या विकासासाठी मतदार संघात कोणताही उद्योग उभारता आला नाही ? ना शैक्षणिक संस्था उभारता आल्या नाहीत ? ना येतील होतकरू गरजू लोकांना व्यवसाय देण्यात यशस्वी ठरले ? सद्य परिस्थिती आपण पाहिली तर तालुक्यात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे येथील तरुण युवा उद्योजक व्यवसायासाठी स्थलांतरण होत आहे . आपल्या तालुक्यात असे व्यवसाय का उभारले जात नाहीत यावर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी तयार होत नाहीत शासकीय कार्यालय, धरणे बांधणे, पाणी सोडणे ,सभामंडप म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे असे मत जनतेमधून येत आहे हे कामे होणारच हे काम करण्यासाठी शासकीय यंत्रणा असते शासकीय निधी याला उपलब्ध होतो म्हणून ही कामे होतात परंतु येथील बेरोजगार तरुणांना उद्योग धंदा व्यवसाय उभारण्यासाठी कोणते कार्य या मतदारसंघात केले असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. सध्या परिस्थितीमध्ये निवडून आल्यानंतर आमदारांची भेट खेडेगावात किवा तालुक्यात होत नाहीत याचा अनुभव आपण पंधरा वर्षे आणि पाच वर्षे घेतलेला आहे.
आमदारांची भेट घ्यायची म्हटलं ठराविक ठिकाणी जाऊन भेट घ्यावी लागते. परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सुटत नाहीत. रिकाम्या हाताने परत यावे लागते असे आपले आमदार होय परांडा २४३ विधानसभेमधील सर्व गाव खेड्या रस्त्यांची अवस्था तीच आहे पूर्वी जसे रस्ते तसेच सद्या आहेत वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये खेड्यापाड्यातील लोकांना जनजीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सुविधा अपुरे आहेत. या सुविधा पुरवण्यासाठी लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरले आहेत विकासाचा मुद्दा फक्त कागदावरच राहतो.ठराविक कार्यकर्ते यांना घेऊन लोकप्रतिनिधी आपली पोळी भाजून घेतात व राजकीय वर्याचस्व टिकवतात यासाठी २४३ परंडा विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी पर्याय ठरणार आहे का ? सद्यस्थितीत आपल्या भूम परंडा वाशी मध्ये एकही मोठे शैक्षणिक संकुल नाही ? सुसज्ज असे हॉस्पिटल नाही ? खेडेगावापर्यंत रस्ते नाहीत ? दिव्यांग बांधवासाठी प्रभावी योजना राबवली नाही ? योवृद्ध माणसे विधवा महिला यांच्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही.अशी दयनीय अवस्था आपल्या भूम परांडा वाशी मतदार संघातील आहे. या अवस्थेला पर्याय म्हणून आपण योग्य तो उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे यासाठी हा संपादकीय सत्तेचा सारीपाट आपल्यासमोर मांडत आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading