🔴अनाळा येथे चालक – वाहक यांचा सत्कार .🔴
🌸 पालकांमध्ये समाधान🌸

माझं गाव माझं शहर अनाळा , दि . २४ – परंडा तालुक्यातील अनाळा येथे भूम आगाराच्या भूम -बार्शी बसचे वाहक -चालक यांचा सत्कार दि . २४ रोजी करण्यात आला .भूम आगाराची भूम – बार्शी बससेवा सुरू झाल्याने न्यू हायस्कुल व अनाळा ग्रामस्थांच्या वतीने न्यू हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच दत्तात्रय पाटील व मुख्याध्यापक वसंत हिवरे यांच्या हस्ते वाहक – चालक यांचा सत्कार येथील शिवाजी चौकात करण्यात आला . हि बससेवा सकाळी ९ वाजता भूमहून वालवड – वाल्हा -अनाळा -परंडा मार्गे बार्शी येथे जाणार आहे . हि बससेवा सुरु करण्यासाठी शाळेच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय पाटील व मुख्याध्यापक वसंत हिवरे यांनी आगाराकडे पाठपुरावा केला होता . बससेवा सुरु झाल्याने बस सकाळी ९. ४५ वाजे पर्यंत अनाळा येथे पोहचत असल्याने वाल्हा येथील ४० शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दुर झाल्याने विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचणार आहेत . त्याच बरोबर अनाळा परिसरातील प्रवाशांनाही बार्शी येथे वैद्यकिय उपचार व खरेदी साठी जाण्यास हि बस उपयुक्त ठरणार आहे . यावेळी बाळासाहेब शिंदे , रामदास हिवरे , महादेव पवार ,बाबू गोडसे , धर्मा शिंदे , न्यू हायस्कुल शाळेचे शिक्षक विठ्ठल बल्लाळ , सचिन पाटील , बाळासाहेब वरपे , खुणे , सपकाळ आदी शिक्षकासह ग्रामस्थ उपस्थित होते .


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading