प्रतिनिधी- परंडा-कंडारी ता.परंडा येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रा.डॉ.निलोफर चौधरी,डॉ.रमा मोरे,शुभांगी देशमुख व महिला वर्ग !
परंडा,ता.९ (प्रतिनिधी) कष्टकरी महिलांनी मनात कसलाही भेदाभेद न ठेवता कुंटुबाला शिक्षित करण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातुन उद्योगात स्वकर्तव्यातुन अग्रेसर भुमिका घ्यावी.प्रतिकुल परिस्थितीचा सामना केल्यास यश मिळतेच असे मत प्रा.डॉ.निलोफर चौधरी यांनी व्यक्त केले.
कंडारी ता.परंडा येथे महिला दिनानिमित्त शुक्रवार ता.८ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माँसाहेब जिजाऊ व साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले.महिला दिनानिमित्त प्रा.डॉ.निलोफर चौधरी व स्ञी रोग तज्ञ डॉ.रमा मोरे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.डॉ.रमा मोरे म्हणाल्या की,महिलांनी दैनंदिन काम करीत असताना आरोग्याची काळजी घ्यावी.महिलांनी निद्रा व आहाराविषयी जागरुक आसले पाहिजे.ज्यांचं पचन चांगले त्यांचे आरोग्य चांगलेच राहते.कुंटुबातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी सतर्क असावे.पालकांनी कुंटुबात वावरताना मोबाईलचा आतिरेक टाळावा.लहान मुलांवर मोबाईलमुळे विपरीत परिणाम होत आहेत.प्रा.डॉ.चौधरी यांनीही उपस्थित महिलांना पाल्याच्या शिक्षणाविषयी,महिलांच्या समस्या व उपाय याविषयी मार्गदर्शन करुन महिला सक्षीमीकरणास बळकटी दिली.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखाध्यक्षा प्रियंका देशमुख, रेखा देशमुख, अनिता करळे, वैशाली डोके, मीना शेळवणे, योगीता तिंबोळे, अंगणवाडी सेविका मिनाक्षी काळे, आर्चना पाटील, आशा कार्यकर्ती सरस्वती दाभाडे, सोनम दाभाडे, जिजाबाई देशमुख,आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.