परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या मतदार संघात चक्क परंडा शहरातील जिल्हा उप रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व्यवस्थितपणे औषधोपचार मिळत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांतुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च या उप रुग्णालयात मोठ्या मोठ्या उपचारासाठी व तपासणी करण्यासाठी मशनरी उपलब्ध करुन दिल्या आहेत.त्या मशनरी चालविण्यासाठी तज्ञ चालकाची नेमणूक न केल्यामुळे त्या मशीन घुळखात पडुन राहिल्याचे समजते तसेच या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर याची नेमणूक न करता शहरातील डॉक्टर याच्या नेमणूक करण्यात आल्या आहेत त्याची स्वताची रुग्णालये परंडा शहरात आहेत त्या मुळे ही मंडळी वेळेवर उपस्थित राहात नसुन आलेल्या रुग्णाची व्यवस्थित पणे तपासणी करीत नाहीत. फक्त तोडी काय झाले असे विचारुन गोळ्या लिहुन देतात आज सरकारचे लाखो रुपये खर्च होऊन सुध्दा ही मंडळी रुग्णाना व्यवस्थित सेवा देत नाहीत. याची वरिष्ठ पातळीवर वरुन चौकशी करण्यात यावी तसेच या रुग्णालयात शहरातील डॉक्टर ची नेमणूक कमी तज्ञ डॉक्टर याची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात येत आहे. तसेच रुग्णांना जास्त कमी झाले की धाराशिव येथे पाठवितात तेव्हा येथील डॉक्टर काय करतात उपचारासाठी कमी असलेल्या साहित्य किंवा मशनरी ची मागणी वरिष्ठ शासनाकडे का करीत नाहीत फक्त कंटाळा म्हणून रुग्णांना पुढील दवाखान्यात पाठवायचे असा प्रकार सध्या चालू आहे तसेच याच्या कडील रुग्णवाहिका ही नेहमी नादुरूस्त तर रस्त्यावर टायर फुटणाऱ्या आहेत त्यामुळे पेशंटला अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी कडे लक्ष देवुन या रुग्णांलयाचा कारभार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.