देवगांव (बु ) प्रतिनिधी (रावसाहेब काळे )
परंडा तालुक्यातील देवगांव (बु ) जेकटेवाडी, गोसावीवाडी येथे अंभी सबस्टेशन येथून विद्युत पुरवठा होतो, मात्र येथील लाईनमन उमेश दुधाळ यांचा गलथान कारभाराचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल दि. 21सप्टेंबर रोजी रात्री 7:30 पासून जेकटेवाडी फिडर बंद आहे असा मेसेज त्यांनी महावितरण ग्रुपवरती टाकला, परंतु त्या नंतर एकही ट्रायल घेण्यात आली नाही. दुधाळ यांना अनेक लोकांनी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद आहे म्हणून सांगत होते. अंभी येथील सबस्टेशन येथे ड्युटीवर असणारे ऑपरेटर साळुंखे यांना फोन केला असता त्यांनी सांगितले ज्या कर्मचारी यांनी फिडर बंद केला आहे त्यांनीच तो फिडर चालू करावा लागतो त्यामुळे आम्ही तो चालू करू शकत नाही. लाईनमन दुधाळ यांचा फोन कधीही बंदच असतो असे येथील नागरिकांतून बोलले जाते. गोसावीवाडी देवगांव (बु )येथील नागरिकांना गेली तीन महिन्यापासून लाईट बिल वाटप झालेले नाही त्यामुळे या भागातील लाईट बिले देखील या निष्क्रिय लाईनमनमुळे महावितरणचे पण नुकसान होत आहे. महावितरण कार्यालय अनाळा येथील जे. ई साठे साहेब यांनी या सर्वं प्रकाराची चौकशी करून लाईनमन दुधाळ यांची त्यांना जमत नसेल तर इतरत्र नेमणूक करावी अशी मागणी संबंधित गावातील नागरिकांतून होत आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading