कुर्डूवाडी(25) – सध्याच्या युग हे ज्ञानाचे युग आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. आपली स्वतःची ओळख संपत्ती नव्हे तर ज्ञानाने होते. जगात जे जे लोक मोठे झाले ते फक्त जिद्द, चिकाटी, सातत्य, वेळेचा सदुपयोग आणि महत्त्वकांक्षा या पंचसूत्रीचा उपयोग केला. हे गूण ज्यांच्या अंगी असतात ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात मोठे होऊ शकतात. नवीन शैक्षणिक धोरणातील मनुस्मृतीला आम्ही विरोध नोंदविला आहे आपणही विरोध नोंदवा. यासाठी विद्यार्थ्यांनी संविधानाची कास धरीत नवभारताची निर्मिती करणारे व्हा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले. ते कुर्डूवाडी येथील श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालय येथे महासंघाच्या माढा तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी,पालक समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी कुर्डवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल, केंद्रप्रमुख लक्ष्मण कारंडे, श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे सचिव डॉ. रवी सुरवसे, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्यसरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हासचिव रवी देवकर, माढा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जानराव, नानासाहेब भालशंकर, दाऊत आतार, विठ्ठल एकमल्ली, शरद सावंत,धनाजी धिमधिमे, मल्लिकार्जुन कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांना ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रशासनाधिकारी शाहू सतपाल म्हणाले, सध्या शिक्षणाचे खाजगीकरण होत चालले आहे. उच्चशिक्षण महाग होत आहे, स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकावयाचे असल्यास तंत्रस्नेही विद्यार्थी होऊन स्वतःच्या पायावर उभे रहा, असे विचार मांडले. यानंतर केंद्रप्रमुख लक्ष्मण कारंडे, डॉ. रवी सुरवसे, महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, रवी देवकर, … देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन व यादी वाचन प्रतिभा पांडव यांनी केले तर प्रफुल्ल जानराव यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.अनुराधा पोळ, प्रा. रोहिदास सोनवणे, विनोद वर, अंकुश जाधव, प्रदीप कांबळे, सुशील भालशंकर, जयश्री बेडकुते, अविनाश भालशंकर, गीतांजली शिंदे, सोमनाथ अनंतकवळस , मारुती धांडोरे, धनंजय हेंबाडे, वीरेंद्र मोरे, संदीप राजगुरू, निलेश घुगे, बाजीराव पाखरे, किसन कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.