एस. व्ही . पाटोळे असोसिएटस व आर . एन. मोटार्स , बाणेर , पुणे यांचा संयुक्त उपक्रम

परंडा , दि . २३ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील जि . प .शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले . दि.२२ रोजी एस. व्ही. पाटुळे असोसिएटस व आर.एन.मोटर्स बाणेर ,पुणे यांच्या वतीने विदयार्थ्यांना एक लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विक्रम पाटुळे , सरपंच अंबिका क्षिरसागर या होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून उदयोजक संदेश तापकीर , अनिल शिदे , गौरव तापकिर , अनुप भोत , यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमात जि . प . शाळेतील तीनशे पन्नास विद्यार्थांना शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . एस.व्ही. पाटोळे असोसिएटसचे विक्रम पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून विदयार्थांनी मोबाईल चा वापर कमी करावा , पालकांनी मुलाकडे लक्ष द्यावे , नियमित अभ्यास करून आपली प्रगती साधावी . शैक्षणिक प्रगती च्या जोरावर नोकरी मिळवावी , व्यवसाय उभारणी करावी असे आवाहन केले . यावेळी उदयोजक संदेश तापकिर , पत्रकार निशिकांत क्षिरसागर यांनी ही विदयार्थ्यांना मार्गदर्शन करून जि . प . शाळेच्या कार्याचे कौतुक केले . अनाळा येथील रहिवाशी अनिल शिंदे व कासारी चे विक्रम पाटोळे हे गत सात वर्षापासून अनाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे . पुणे येथे या दोन तरुण युवकानी आपल्या कर्तत्वाच्या जोरावर एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले असून ते आपल्या कमाईतून समाजाचे ऋण फेडत आहे . कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक सुर्यकांत साळूंके , शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रेवननाथ शिंदे , उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे , समाजसेवक नानासाहेब आनाळकर , पत्रकार अलिम शेख , साजिद शेख , उपसरपच कल्याण शिदे , ग्रा. प. सदस्य दादासाहेब फराटे , सोनार संघटनेचे विनोद चिंतामणी , शिवाजी जाधव , प्रा.विकास सरवदे ,कानिफनाथ फराटे , जालिदर शिदे , श्रीमंत शिंदे , जेजेराम गिलबिले , संदीप थोरात , केशव पवार , युवा प्रतिष्ठाण, जगदंब ग्रुपचे सर्व पदाधिकारी , सर्व शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी ते साठी युवा प्रतिष्ठाण चे कार्यवाहक तथा महाराष्ट्र पोलीस लक्ष्मण क्षिरसागर व सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले . कार्यकमाचे सुत्र सचालन व आभार केमदारणे यांनी व्यक्त केले .

अनाळा ता. परंडा येथील जि.प.शाळेत विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उदयोजक विक्रम पाटोळे , अनिल शिदे , सरपंच अंबिका क्षिरसागर , सर्व शिक्षक , ग्रामस्थ व विद्यार्थी .

प्रतिक्रिया – गत सात वर्षांपासून अनाळा येथील जि. प . शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे . समाजाचे ऋण कोठेतरी फेडावे या उदारमत विचाराने मी व अनिल शिदे ही मदत करत आहोत . मदतीनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरिल भाव पाहून फार समाधान वाटते .
विक्रम पाटोळे – एस. व्ही . पाटोळे असोसिएटस बाणेर , पुणे .


Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading