माझं गाव माझं शहर(प्रतिनिधी) परंडा येथे
जय मल्हार जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष दाजीराव दशरथ मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथे जनरल कामगार संघटनेच्या शाखेचे जाहीर उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांच्या हस्ते करण्यात आले .या उद्घाटन प्रसंगी रिपाईचे राज्य सरचिटणीस संजयकुमार बनसोडे फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के सहसचिव मोहन दादा बनसोडे मराठवाडा अध्यक्ष बालाजी शिंगे यांची उपस्थिती होती . या उद्घाटन प्रसंगी धाराशिव महाराष्ट्र राज्याचे खजिनदार मकबूल सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष आलिशान शेख जिल्हा महासचिव जे बी बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष बाळू शिंगे भूम परंडा वाशी या तिनही तालुक्याचे अध्यक्ष मोहम्मद शेख उमरगा येथील कविता माने सुनीता देशमुख अकलूज येथील नबीलाल सय्यद व आकाश साठे तसेच परंडा शहराध्यक्ष गौस मुजावर उमरगा तालुका अध्यक्ष कविता घाडगे तुळजापूर येथील राजेंद्र बंडगर सुधीर नळदुर्गकर आदींची उपस्थिती होती .कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना असून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव दशरथ मारकड करत आहेत . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या साठी केलेला जो कायदा लागू केला आहे त्याच कायद्याप्रमाणे सर्वांना चांगले वेतन कामाचे ठरावीक तास अशा विविध अनुषंगाने ही संघटना काम करत आहे . व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे व प्रतिनिधित्व करण्याचे कार्य हाती घेतले आहे . उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रवीण दादा रणबागुल म्हणाले की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणाऱ्या गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार राजरोसपणे चालू आहे . त्याला वाचा फोडण्यासाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रबंध होऊ शकतो . या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव मारकड यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत .सर्वांनी या संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम केल्यास नक्कीच या संघटनेची मोठ्या प्रमाणात यशस्वी तिकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही .
यावेळी डॉ शहाजी चंदनशिवे संजयकुमार बनसोडे बालाजी शिंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केली . यावेळी परंडा शहरातील व तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.