परंडा ग्रामीण दि . ०१ -परंडा तालुक्यातील अनाळा येथे ग्रामदैवत श्री कालिकादेवी ची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . या यात्रेचा समारोप ग्रामस्थांच्या वतीने भरवण्यात आलेल्या जंगी निकाली कुस्तीच्या मैदानाने झाला . या कुस्ती मैदानाचे उद्घाटन दि. २९ रोजी अनाळा येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पैलवान व प्रतिष्ठित नागरिक यादवराव क्षिरसागर – पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी माजी जि.प. सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती चे सदस्य
पै . नवनाथ जगताप ,पै . जयराम नलवडे , अनाळा चे सरपंच ज्योतीराम क्षीरसागर , माजी सरपंच दत्तात्रय पाटील, पत्रकार निशिकांत क्षिरसागर , महाराष्ट्र पोलीस लक्ष्मण क्षिरसागर, सतिश शिंदे , माजी सैनिक अंगद सातपुते , रामा हिवरे , इश्वर क्षिरसागर , सुग्रीव फराटे , बिबीषण शिंदे सागर राऊत , विनोद चिंतामणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . श्री कालीका देवीच्या मंदिरासमोरील मैदानावर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्तीच्या मैदानास परिसरातील व इतर जिल्ह्यातूनही शेकडो कुस्ती मल्लांनी हजेरी लावून या कुस्ती मैदानाची शोभा वाढवली . या मैदानावर १०० रुपयांपासून ५१ हजार रुपयांच्या निकाली कुस्त्या करण्यात आल्या . यावेळी ग्रामस्थांच्या व कुस्तीप्रेमींच्या वतीने हजारो रुपयांची बक्षिसे देखील मल्लांना वाटप करण्यातआले . या मैदानात पै . रवींद्र खैरे विरुद्ध पै. विकास गटकळ,पै. सागर मोरे विरुद्ध पै. बंडा सानप , पै पांडुरग कावळे कुर्डूवाडी विरुद्ध पै गणेश काळे,पै दत्ता मेटे विरुद्ध पै समीर शेख कुक्कडगाव, सागर हुलगे कुर्डूवाडी विरुद्ध सद्दाम जमादार , यांच्यात निकाली कुस्त्या होऊन या मल्लाना १० हजारापासून ५१ हजार रुपये पर्यंतची बक्षिसे देण्यात आली . या जंगी कुस्ती मैदानाची अंतिम कुस्ती पै. सागर मोरे कंडारी विरुद्ध पै. बंडा सानप जामखेड यांच्यामध्ये अंतिम ५१ हजार रुपयाची कुस्ती झाली . या अंतिम झालेल्या कुस्तीमध्ये कंडारीचा मल्ल पै . सागर मोरे यांने रोख रक्कम ५१ हजार व मानाची ढाल जिंकून उपस्थित प्रेशकांची मने जिंकली . या कुस्ती मैदानाचे विशेष आकर्षण म्हणजे अडीच वर्षाचा पै . मल्हार निशीकांत क्षिरसागर याने मैदानात फिरुण बक्षिस जिंकले . हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पैलवान ईश्वर क्षीरसागर , माजी उपसरपंच पै .दादा फराटे, पै . नागनाथ क्षिरसागर ,पै . बालाजी मांजरे , पै बापु शिंदे ,पैलवान तात्या बोरकर , उमेश क्षिरसागर , पै सागर राऊत ,रामा हिवरे ,मुकुंद रिटे ,अंगद गरड यांनी विशेष परिश्रम घेतले .या वेळी कुस्ती पंच म्हणुन पै . जयराम नलवडे , पै .आप्पा कारंडे ,पै बालाजी बुरुंगे ,पै .आदेश तिबोंळे , पै . सचिन मचिद्र ,पै .बापु शिंदे , पै . सतिष मिस्कीन ,पै .विठ्ठल वाघमोडे , पै.अशोक वाघमोडे ,पै. किरण सुरवसे , पै.तानाजी मसगुडे ,पै. कैलास झिरपे , पै. शहाजी मिस्कीन ,पै . भैय्या बकाल , पै.गणेश रणदिवे आदीनी पंच म्हणुन काम पाहीले . कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी ग्रा. प . सदस्य चांगदेव चव्हाण , विनोद कदम , अमित देशमुख, अरुण चोपडे , समाजसेवक अनिल शिंदे , कालीदास शिंदे उद्योजक राहुल जाधव ,सागर शिंदे ,ओंकार क्षिरसागर , चेतन क्षिरसागर , गणेश क्षिरसागर यांच्यासह ग्रामस्थानी परिश्रम घेतले . उत्कृष्ठ समालोचन गवळी यांनी करून उपस्थितांची मने जिंकली .
🔴१० वर्षापासून बंद असलेले कुस्ती मैदान यंदा सुरु झाल्याने परिसरातील नागरिक समाधानी .
🔴 जेष्ठ मल्ल व जेष्ठ नागरिक यादवराव क्षिरसागर यांना कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्याचा ग्रामस्थाच्या वतीने मान .
🔴 कंडारीचा मल्ल पै . सागर मोरे याने पै . बंडा सानप याला चितपट करत मिळवले ५१००० रुपये बक्षीस व ढाल .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.