परंडा दिनांक 27 लोकसभा निवडणुकीसमोर भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसत असले तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कधी होणार त्यांच्यातील एकीचे दर्शन जनतेला कधी दिसणार असे एक ना अनेक प्रश्न कार्यकर्त्यातून उपस्थित केले जात आहेत
भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या शिफारशीने तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अशासकीय समिती गठीत करण्यात आली या समितीवर सावंत गटाच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले मात्र सत्तेत सहभागी असलेल्या भाजप कार्यकर्त्याला संधी दिली गेली नाही स्वयंपुरते राजकारण करणाऱ्या व निवडणुकीत केवळ वापर करून नंतर वाऱ्यावर सोडून देणाऱ्या नेत्याविषयी पदाधिकारी कार्यकर्त्यात नाराजी असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सांगितले.
धाराशिव लोकसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सर्व मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाच्या बैठका भेटीगाठी वाढल्या आहेत ग्रामीण भागातील जुन्या नव्या निष्ठावंतांची सांगड घालून निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम राजकीय पक्षाकडून सुरू आहे लोकसभा निवडणुकीत गाव पुढारी गावातून किती मताधिक्य देणार त्यावरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कोण पात्र ठरणार आहेत असे सांगून पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला लावले जात आहे त्यामुळे गाव पुढारी जोमाने निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅट्रिक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र राज्यस्तरावरील नेत्यांनी भाजप मित्र पक्षाचे चारशेच्या वर खासदार निवडून आणण्यासाठी आटापिटा करीत आहे राज्यात अस्तित्वात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार यांचेच प्रतीक आहे असे असताना जिल्ह्यात मात्र अनेक गटातटामध्ये विभागलेल्या भाजपमध्ये एकी दिसेना नुकतेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या फडाच्या व्यासपीठावर हजेरी लावून सावंत यांच्या विकास कामाचे ठाकूर यांनी कौतुक करून नेत्यांचे मनोमिलन झाले
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.