परांडा (प्रतिनिधी) शहरातील महाराणा प्रताप चौक बावची चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते व अनधिकृत होर्डिंग यांनी जागा व्यापले आहे .त्यामुळे मोठे वाहन इमर्जन्सी वाहतूक करण्यासाठी अडचण ठरत आहे तरी नगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन येतील अतिक्रमण हटवून रस्त्याला श्वास घेण्यासाठी वाट मोकळी करावी या ठिकाणी मोठे ट्रक, अग्निशामक दलाची गाडी ,शालेय विद्यार्थी यांना जाण्यासाठी येण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे त्याचबरोबर गावात जाणाऱ्या रस्त्यावर विविध हातगाडे यांनी अतिक्रमण केले आहे नागरिकांना विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे या गोष्टीकडे प्रशासकीय अधिकारी नगरपालिका यांनी त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.