परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरुदेव यात्रा परज,धार्मीक अध्यात्मिक,मनोजन युक्त कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाली.
परंडा [ दि२५ एप्रिल ] परंडा तालुक्यातील आवार पिंपरी तेथील शेकडो वर्षांपासून चालु असलेली श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेचा चैत्र शुद्ध १२ (बारस) २० एप्रिल रोजी शुभारंभ होऊन चैत्र वद्य प्रथमा २४ एप्रिल रोजी विविध अध्यात्मिक व धार्मीक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाली.
चैत्र शुद्ध १२ बारस अर्थात दि २० एप्रिल रोजी घटस्थापना करून यात्रेला सुरुवात होतें या पाच दिवसांमध्ये गावातील अनेक भाविक उपवास करतात,घरोघरी यात्रेची जय्यत तयारी करत असतात यामध्ये य पाच दिवसांत दररोज संध्याकाळी धनगरी ओव्याचा कार्यक्रमातुन लोक प्रबोधन करत अनेक दैवता बद्दल अख्यायिका सांगितल्या जात होत्या.तसेच दि.२२एप्रिल रोजी गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी बारामती येथील ऑर्केस्ट्रा पार्टी यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,तसेच चैत्र शुद्ध पौर्णिमा दि.२३एप्रिल रोजी संध्याकाळी श्री विठ्ठल बिरूदेव यांच्या अंबीलीचा कार्यक्रम होऊन ग्राम दैवत बिरोबा यांना हळद लावण्यात आली व भावीकांना महाप्रसादचे वाटप करण्यात आले.दि २४ एप्रिल रोजी चैत्र वद्य प्रतिपदाला गावातील पायाबा मंदिर येथे विठ्ठल बिरुदेव यात्रेतील सर्व हेडाम एकत्र येत पायबा मंदिरापासून मानाचे हेडाम तुळशीदास नरुटे देव यांच्या परजेला ढोल,झांज,हलकी, तुतारी यांच्या निनादात सर्वत्र भंडारा उदळत सुरुवात झाली.
परज दरम्यान सर्वत्र भंडाऱ्यांची उदळन केल्यामुळे सर्व यात्रेकरू भावीक व रस्ते भंडारायुक्त पिवळे होउन गेले होते तर फटाक्याची आतषबाजी करत देवाची परज गावातील प्रमूख मार्गांनी निघत ती बिरोबा मंदिरापर्यंत पोहचली आणि बिरोबा मंदिरासमोर अनुदेव मारकड देव आसू,शिवाप्पा मासाळ देव असु,लिंबराज माने देव कौडगाव आणि शेवटीं अंजनगाव खेलोबा येथील हेडाम सुभाष वाघमोडे यांची परज झाली तर यांना सातपुते (चाटू) म्हणूण नानासाहेब डाकवाले हे होतें तर भंडारे म्हनून काशिनाथ राजूरकर हे होतें.
यांनतर बिरोबा आणि देवी कामाबाई यांचे लग्न लावण्यात आले.संध्याकाळी ब्यांड बेंजो च्या निनादात बिरोबा देवाच्या पालखी सोहळा गावाच्या मुख्य मार्गाहून काढण्यात आला.पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत गावातील सर्व महीला,पुरुष,तरुण तसेच सर्व ग्रामस्थ हे स्वतः भाग घेऊन ग्रामदैवत बिरोबा यांची यात्रा भक्तिमय आणि उत्साहपूर्वक वातावरणात साजरी केली.
सर्व यात्रा काळात महिलांची संख्या लक्षणीय होती तर पंचक्रोशीतील हजारों भाविकानी या यात्रेत बिरोबाचे दर्शन घेतले.यात्रेसाठी यात्रा कमिटी,ग्रामस्थ,युवक यांनी योग्य नियोजन व परिश्रम घेतल्यामुळे यात्रा उत्सहात पार पडली.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.