परंडा-शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३९ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोनार समाजातील थोर संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी शनिवार (दि.१५) सराफ व सुवर्णकार संघटनेच्या वतीने साजरी करण्यात येत आहे.सराफ व्यापारी मनोज चिंतामणी यांच्या मातोश्री निवासस्थानी संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सवा निमित्त शनिवारी सकाळी १० ते १२ या कालावधीत श्रीसंत बाळुमामा जिवन चरित्र कथाकार तथा बाळुमामा मालिका फेम (रामाण्णा) प्रसिध्द किर्तनकार मेजर विक्रम जगताप यांचे गुलालाचे किर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता पुष्पवृटी करण्यात येणार त्यानंतर महाआरती करुन महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.कार्यक्रमास भाविक भक्तानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन सराफ व सुवर्णकार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.