देवगांव (बु )प्रतिनिधी दि.13. परंडा तालुक्यातील देवगांव( बु ) हे गाव दळण – वळणाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे येथून राज्य मार्ग हा दहा किलोमीटर अंतरावर आहे व भूम तालुक्यातील अंभी हे गाव चार किलोमीटर अंतरावर आहे अंभी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशन अलसल्याने या चौकातून वाहनाची ये जा नेहमी चालू असते तसेच देवगांव (बु )येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा देखील पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी देखील येथून वाहनाची ये जा चालू असते,अहमदनगर जिल्यातील जामखेड तालुक्याची सिमा हद्द देखील पाच किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य म्हणजे या चौकामध्ये पूर्णपणे अतिक्रमण झाले असल्यामुळे येथील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अडचणीची बनत चालली आहे. या मुख्य चौकातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम कार्यालयाने पाहाणी करून येथील वाहतूक कोंडी कशी सुरुळीत करता येईल हे पाहाणे गरजेचे आहे
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.