मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील हजारो पत्रकार आजारी असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या तपासणीत हा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. या आजारी असणाऱ्या पत्रकारांची संख्या जेव्हा हजारोच्या प्रमाणात आहे असे कळल्यावर पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागच्या तीन महिन्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेने राज्यभरात पत्रकारांच्या तपासणीचे कँम्प, शिबीर, हे तालुका, जिल्हा, शहर या ठिकाणी आयोजित केले होते. राज्यभरात १४८ ठिकाणी या आरोग्य तपासणीचे आयोजन केले गेले होते. ज्यात प्रिंट, टीव्ही, रेडिओ, डिजिटल मीडियाच्या ७८०० पत्रकारांची तपासणी केली गेली. यात तपासणी केलेल्या १३२८ पत्रकारांना शुगर, २९१२ पत्रकारांना बीपी, १०२० पत्रकारांना थायरॉड झाल्याचे आढळून आले.यात अन्य छोटे छोटे आजार असणाऱ्या पत्रकारांची संख्या ६१३ होती. ७८०० मध्ये पाच हजारावून अधिक आजारी असल्याचे पुढे आले आहे. या सर्व पत्रकारांना नियमित औषधी त्यांच्या नियमित तपासण्या करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे आरोग्य विंगचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी सांगितले आहे. जे पत्रकार आजारी आहेत, त्यांना औषध, नियमित तपासणी ज्या प्रमाणे सल्ला दिलाय त्या प्रमाणे केले तर दोन महिन्यात किमान ५० टक्के पत्रकारांचे आजार कमी होतील असे मत या तपासण्या करणारे डॉ. प्रमोद अनसापुरे यांनी व्यक्त केले आहे. आम्ही आरोग्याच्या उद्देशाने शासनाला अनेक वेळा उपाय योजना सुचवल्या, त्यांना आराखडा तयार करून दिला, पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता आम्ही शासनाविरुद्ध पत्रकारांच्या आरोग्यासाठी कायदेशीर लढाई लढणार आहोत. असे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे कायदेशीर सल्लागार अंड संजीवकुमार कल्लकोरी यांनी सांगितले. आम्ही पत्रकारांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची काळजी आम्ही घेऊ. आम्हाला मदत करायला शासनाला लाज वाटत असेल तर शासनाच्या भिकेची गरज नाही असा संताप ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकारांनो तब्बेतीची काळजी घ्या असे आवहान ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या वतीने राज्यातील सर्व पत्रकारांना करण्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात सर्व जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी आजारी पत्रकारांच्या तब्बेतीची फेर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व पत्रकारांसाठी नियमित कॅम्प घेतले जाणार आहेत अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी दिली आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading