शिर्डी प्रतिनिधी:(३१)
भारतातील क्रमांक एकची व आंतर राष्ट्रीय पत्रकार संघटना असलेल्या ‘ व्हॉईस ऑफ मीडिया ‘ चे दुसरे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे शनिवार दिनांक 31 आगस्ट पासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्य भरातून हजारो पत्रकार साईबाबांची नगरी शिर्डी येथे दाखल झाले आहेत.

व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाचे शिर्डी ३१ ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी होत आहे. या अधिवेशनाची उत्सुकता संपूर्ण राज्यातील पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या काना कोपऱ्यातून पत्रकार शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. श्रीकांत शिंदे, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार हेमंत पाटील, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता अरुण शितोळे पाटील व भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते हे प्रमुख अतिथी असणार आहेत.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘ व्हाईस ऑफ मीडिया’ च्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी ‘ व्हॉईस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार २०२४ ‘चे वितरण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. यंदा विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अशोक वानखडे, तुळशीदास भोईटे व सरिता कौशिक हे या पुरस्काराचे मानकरी आहेत. या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडियाचे देशातील आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. भारतातील सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष तसेच नेपाळ, स्पेन, अफगाणिस्तान यासह विविध देशातील निमंत्रित सदस्य हेही अधिवेशनास हजेरी लावणार आहेत.

राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी केले आहे.
चौकट

आजचे कार्यक्रम…

  • सकाळी 9 वाजता..पहिले सत्र – संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय, दुसरे सत्र – उद्घाटन समारंभ व जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण, तिसरे सत्र पुरस्कार प्राप्त संपादकांची प्रकट मुलाखत, चौथे सत्र – आम्ही घेतोय पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी ( चर्चासत्र, सत्कार समारंभ), पाचवे सत्र – माझा जिल्हा माझे व्हिजन ( जिल्हाध्यक्षांचे चर्चासत्र ), अधिवेशन घेण्यामागची भूमिका…(चर्चासत्र ), रात्री – सांस्कृतिक कार्यक्रम

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading