परंडा दि. २६ (प्रतिनिधी)- प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपुर येथे दि.२५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. बळीराजा शेतकरी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन पंढरपुर येथे दि. २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेच्या दुसऱ्यावर्दापण दिनाचे औचित्य साधून राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिचा राज्यस्तरीय
पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेच्या माध्येमातून परंडा तालुक्यात सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे परंडा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे, सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती ताई शिंदे, भगीरथ भालके, संत शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन बागल, बळीराजा शेतकरी संघटने राज्य संपर्कप्रमुख रमेश गणगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आप्पासाहेब तरटे यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते..
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.