परंडा प्रतिनिधी (08) तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या विविध समस्यांचा आढावा घेत मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडीया यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. पत्रकार बांधवांना येणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपली पत्रकार संघटना कायम पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. पत्रकारांचे प्रश्न सोडविणे पत्रकारांचे प्रश्न सोडवणे पत्रकारांचे आरोग्य पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण आणि पत्रकारांना घरे अशा विविध पंचसूत्री कार्यक्रमावर आपली संघटना महाराष्ट्र मध्ये काम करते असे मत मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी बैठकीमध्ये व्यक्त केले. आगामी काळात होणार्याया शिर्डी येथील अधिवेशनाची माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे, जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत परंडा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद तालुका अध्यक्ष प्रमोद वेदपाठक कार्याध्यक्ष मुजीब काझी सचिव तानाजी घोडके सहसचिव रवींद्र तांबे मराठवाडा सदस्य आप्पासाहेब शिंदे श्रीराम विद्वत, समीर ओव्हाळ संतोष शिंदे धनंजय गोपने विजय मेहर साजिद शेख गोरख देशमाने फारुख शेख रावसाहेब काळे नानासाहेब केसकर पांडुरंग ठोसर उत्तरेश्वर शिंदे आधी सह पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी घोडके यांनी केले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.