परंडा (माझं गांव माझं गांव)शहरातील परंडा येथे पोलीस वर्धापन दिन मा.पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांप्रमाणे मा. पोलीस अधिक्षक श्री संजय जाधव, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री गौहर हसन, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०२.०१.२०२५ रोजी ते दिनांक ०८.०१.२०२५ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिनानिमित्त पोलस ठाणे परंडा कडुन वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सदर सप्ताहात पोलीस ठाणे परंडा अधिकारी व कर्मचारी यांचेकडुन शाळा तसेच महाविदयालयास भेटी देवुन, पोलीस विभागाची माहिती देण्यात आली तसेच महिला व मुलीच्या स्वसंरक्षण तसेच महिलांवर होणारे अत्याचार याविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे परंडा शहरात वर्धापन दिनानिमित्त शालेय विदयार्थ्याची रॅली काढुन सामाजिक सुरक्षा तसेच वाहतुक सुरक्षा, वाहतुकीचे नियम व सुरक्षित वाहतुक या विषयी जनजागृती करण्यात आली.
दिनाक ०७.०१.२०२५ रोजी शालेय विदयार्थी यांचे पोलीस ठाणेस भेटीचे आयोजन व शस्त्र प्रदर्शन करण्याचे आयोजन केले असता ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिटयुट प्राथमिक उच्चप्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा, परंडा व शिवाजी महाविदयालय परंडा येथील २०० ते २२५ विदयार्थी व शिक्षक यांनी पोलीस ठाणेस भेट देवून पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेतली. सदर वेळी प्रभारी अधिकारी श्री विनोद इज्जपवार, पोलीस निरिक्षक पोस्टे परंडा, यांनी पोलीस दलाचा इतिहास व पोलीस ठाणेचे कामकाज माहिती देवून पोलीस हे पोलीस दादा, पोलीस काका, असुन न घाबरता पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. सहा. पोलीस निरिक्षक श्री शंकर सुर्वे यांनी सायबर गुन्हे याबाबत सविस्तर माहिती दिली तर पोलीस उपनिरिक्षक श्री बाबासाहेब खरात यांनी महिला वरील अत्याचार विरूध्द गुन्हेविषयक माहिती देवून तरूण मुला मुलीनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता काळजी घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले. त्याच बरोबर शिवाजी महाविदयाल चे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर, ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिटयुट प्राथमिक उच्चप्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा, परंडा परंडाचे संस्थापक श्री गोरख मोरजकर व सचिव तथा मुख्याध्यापिका श्रीमती आशाताई मोरजकर मॅडम यांनी पोलीस दलाकडुन करण्यात येत असलेल्या कार्याबदल आत्मियता व्यक्त केली. तसेच खाकी वर्दीतील आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे श्री विनोद इज्जपवार साहेब असे संबोधुन महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading