परंडा प्रतिनिधी) परंडा शहरात मूख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असताना ही संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शहरवासीयांमधुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . मध्यंतर च्या काळात नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे रुजविण्यासाठी मरुम टाकण्यात आला होता पण सारखीच वाहतूक असलेल्या मुळे त्या मुरुमाची माती झाली व पुन्हा खडे डघडे पडल्याने पुन्हा प्रशासनाने विना डांबर खडी टाकली होती पण ती खडी वाहनांच्या वेगाने डडुन नागरिकांना लागत आहे व ती खडी संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे शिवाय सध्या एक वाहन जरी गेले तरी धुळीचे लोट होतात शिवाय पादचारी यांना सुध्दा चालताना त्रास होत आहे शहरातील व्यावसायिक या धुळीस वैतागून गेले आहेत अशी परिस्थिती तालुक्यातील विविध रस्त्याची आहे तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी या कडे लक्ष देवुन खराब झालेली रस्ते नव्याने त्वरित दुरूस्ती करून द्यायला पाहिजेत अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे
तसेच परंडा ते वारदवाडी या रस्त्यावर ही गेले अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ते बुजविण्याचे काम केले नाही त्यामुळे वाहन चालकाना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते शिवाय रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडल्या च्या घटना घडल्या आहेत भुम ते परंडा या नवीन रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे अशी चर्चा गेल्या तीन वर्षे पासून होत आहे पण अघपि कामाला सुरुवात केली नाही तसेच तालुक्यातील पालखी मार्ग चे कामाला मंजुरी मिळाली असताना ही पालखी मार्गाच्या कामाला सुरुवात केली नाही पण तालुक्याच्या सरहद्दीवरून सोलापुर जिल्ह्यात पालखी मार्गाचे काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत पण धाराशिव जिल्ह्यात का काम सुरू झाले नाही हे समजून येत नाही तसेच सध्या बांधकाम विभागाचे वतीने पडलेले खड्डे बुजविण्याचे काम चालू केल्याचे दिसून येते पण कालांतराने पुन्हा खड्डे पडून खड्डी उघडी पडते पुन्हा पाहिले पाढेपंचावन्न अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित लक्ष देवुन नवीन रस्त्याची कामे सुरू करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतुन होत आहे
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.