परंडा ( 22) घाटकोपर मुंबई पुणे येथील लोखंडी होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था धोकादायक होर्डिंग हटवण्याच्या कामाला लागले आहेत मुख्याधिकारी श्रीमती वडेपल्ली यांनी ही मोहीम परंडा नगरपालिकेत राबवली परंडा नगरपालिकेने संपूर्ण रस्त्यावरील होर्डिंग बॅनर पोकलेन च्या साह्याने काढले आहेत . नगरपालिकेची कार्यवाही सार्वजनिक ठिकाण रोड रस्ते यावरील फलक बोर्ड काढणे हे ठीक आहे. परंतु खाजगी मालकीच्या जागेतील दुकानाचेही बोर्ड काढल्याने व्यापारी संतापले आहेत मालकीच्या जागेतील दुकानाचे छोटे बोर्ड काढल्याने दुकानदाराचे नुकसान केले असल्याचे व्यापारी संतापले आहेत. मुख्याधिकारी श्रीमती वडेपल्ली स्वतः हजर होत्या त्यांना खाजगी मालकीच्या जागेतील दुकानाचे बोर्ड काढता येतात असे विचारले असता परवानगी घेऊन पुन्हा लावा.असे सांगितले परंतु सर्व बोर्ड काढण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत असे सांगितले या कारवाईने व्यापाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे अशाच प्रकारे नागरिकांमध्ये प्रश्न उभा राहिला आहे की परंडा शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे रस्त्यालगत रस्त्यावर हे अतिक्रम काढण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांना कितपत यश येणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.