प्रतिनिधी (माझं गांव माझं शहर) दि ०५. परंडा तालुक्यातील लोणी येथे नारीशक्ती महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी उत्साहात पार पडली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम प्रार्थनेने या सभेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष परंडाचे सनियंत्रण व मूल्यमापन व्यवस्थापक श्री विलास ताटे सर यांनी उपस्थित राहून महिलांना अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच यामध्ये आपल्याला IFC,उत्पादक गट,CMEGP च्या माध्यमातून व्यवसाय करता येऊ शकतात याचे सविस्तर मार्गदर्शन मार्गदर्शन केले. यावेळी स्वामी विवेकानंद महिला प्रभाग संघ अध्यक्ष सुनीता शिंदे यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले यावेळी पद्मिनी केमदारणे यांनी आर्थिक लेखापरीक्षणाचे वाचन केले एकात्मिक शेती प्रकल्प विषयी माहिती दिली सेंद्रिय शेती पोषण बाग याविषयी माहिती दिली यावेळी उपस्थित प्रभाग समन्वयक श्री समाधान माळी सीआरपी जुलेखा शेख बँक सखी निर्मला घुबडे कृषी सखी दळवी ग्राम संघ पदाधिकारी व समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.