परंडा (प्रतिनिधी) कपिलापुरी ता.परंडा येथील घटनेतीलआरोपीस त्वरीत कोठडी करावी. २५ नोहेंबर रोजी मौजे कपिलापुरी तालुका परंडा जिल्हा धाराशिव या ठिकाणी मातंग समाजाच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला करून महिला, लहान मुले व पुरुष यांना घराबाहेर ओढून त्यांचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना रक्तभोंबाळ करून आरोपी पसार झाले आहेत. काल संबंधित लोकांवरती रीतसर गुन्हे दाखल केले असताना देखील अद्याप पर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही. हे लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तात्काळ माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परंडा तसेच पोलीस ठाणे परंडा यांना रीतसर निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशा स्वरूपाचे निवेदन दिले आहे यावेळी लहुजी शक्ती सेना कोर कमिटी जिल्हा उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ साठे परंडा तालुका अध्यक्ष लक्ष्मण भाऊ चव्हाण, परांडा तालुका उपाध्यक्ष अमोल भाऊ जाधव,महिला तालुकाध्यक्ष राजश्री चव्हाण, परंडा शहराध्यक्ष सुनील दनाने, मागासवर्गीय तथा मा.पंचायत समिती सदस्य गुलाब भाऊ शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading