माझं गांव माझं शहर ( परंडा) : येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता सखी धनंजय सावंत यांच्या हस्ते पूजन करून झाली. यानिमित्त वजनकाटा स्थळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य शेती अधिकारी भगवान काळे, चीफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र काळे, चीफ केमिस्ट्री दादा बोरकर, हेड टाईम कीपर सुरेश साळुंखे, बिसलरी मॅनेजर अजित भोसले, ज्येष्ठ अकाउंटंट बाळासाहेब धुमाळ, गोडाऊन कीपर श्रीकृष्ण झिरपे, सुपरवायझर अमोल कदम, केनयार्ड सुपरवायझर नीलकंठ बालगुडे, ऊस पुरवठा अधिकारी गणेश गरदडे, ऊस विकास अधिकारी अशोक हांगे, इन्स्ट्रुमेंट इंजिनियर सोमनाथ वाडेकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कारखान्याच्या १६ व्या गळीत हंगामात ४ लाख ९० हजार टन ऊसाचे गाळप झाल्या असून ४ लाख ३० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने २० जानेवारीपर्यंत २७२५ दर दिला आहे. २१ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान गाळप करण्यात आलेल्या ऊसाला २८०० रुपये दर तर, १५ मार्च ते कारखाना गाळप बंद होईपर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला २९२५ रुपये दर देण्यात आलेला आहे. सभासदांसह सर्व घटकांच्या हितासाठी कारखाना प्रशासन कटिबध्द असल्याचे सखी धनंजय सावंत यांनी सांगितले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.