परंडा, (माझं गांव माझं शहर )नवराञोत्सवानिमित्त शहरातील गार भवानी मंदीरात शनिवार ता.१२ रोजी सांयकाळी ७ वाजता परंपरेनुसार विधिवत शस्ञपुजा व शमीपुजन करुन सिमोल्लघंन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.आपट्याची पाने लुटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शहरातील जुन्या तहसील कार्यालयातील उप कोषागार ( ट्रेझरी) कार्यालयात सांय सहा वाजता लक्ष्मीपुजन करण्यात आले.त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात,आराधी पोत घेऊन कांही वेळ पावसाच्या हलक्या सरी आल्याने पावसातच वाजत गाजत मिरवणुक काढुन,गार भवानी मंदिरात पुजेचा मान असलेले तहसिलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शस्ञपुजन व शमीपुजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मकरंद जोशी यांनी पौराहित्य केले.यावेळी सहायक पोलीस निरिक्षक प्रविण शिरसट, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी,अंबादास देशमुख,तलाठी संघटना तालुकाध्यक्ष चंद्रकांत कसाब,मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार,विनोद चुकेवाड,नवनाथ सोनवणे,शासकीय कर्मचारी,प्रतिष्ठीत नागरीक आदिंची उपस्थिती होती.यावेळी नवराञ महोत्सवात नऊ दिवस आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. शहरात सकाळपासुनच विजयादशमीनिमित्त बाजारपेठेत फुलांसह, विविध वस्तु खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.गारभवानी परिसर आकर्षक रोषणाईने उजळुन निघाला होता.दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. नवराञ उत्सवासाठी गारभवानी मंडळाचे अध्यक्ष अभिजीत जाधव, माकणीकर,सचिव कृष्णा चौधरी,उमेश सोणवणे, दत्ता मेहेर,अरुण कानडे,बाळु माकणीकर,अमित ठाकुर,रणजीत माने,हणमंत जाधव,प्रकाश सोनवणे,भारात जाधव आदिनीं पुढाकार घेतला.तसेच शहराचे ग्रामदैवत भवानी शंकर मंदिरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शमीचे पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छां दिल्या.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.