परंडा : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयच्या माध्यमातून अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2024 ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे दरवर्षी इयत्ता आठवीमध्ये इ नववीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते. यावर्षी ही परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये संत मीरा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कु सिद्धांत दुर्गाअप्पा पवार (इयत्ता आठवी) याने अतिशय उत्कृष्ट गुण मिळवत सातारा येथे सैनिकी स्कूलच्या लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने प्राचार्य संतोष भांडवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिष देशमुख सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. त्याला सर्व शिक्षक, सुजित देशमुख व पालक दुर्गाप्पा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील यांनी सिद्धांत पवार यांचे कौतुक केले आहे
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.