प्रतिनिधी: श्री क्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सदगुरु बाळूमामा यांची पालखी क्रमांक १ परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी येथे २१ ऑक्टो. रोजी गावातून पालखीची मिरवणुक काढण्यात आली . या मिरवणुकीमध्ये ३ क्विंटल भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. तसेच गावा मध्ये या पालखीचा पाच दिवस दररोज हरि किर्तन व आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होत होता तसेच मिरवणूकीमध्ये भाविक हरी भजनात व डॉल्बीच्या तालावर दंग झाले होते . बाळूमामाच्या नावानं चांगभल या जयघोषात परिसर सारा दुमदुमून गेला होता.या पालखी मार्गावर भाविकांनी जेसीबीमधून फुलांची व भंडार्याची उधळण करीत भाविक पुष्पवृटी भंडार्यात रंगून गेले होते. संपुर्ण गावातील रस्ते भंडाऱ्यामुळे माखून गेले होते. या बाळूमामाच्या पालखी मिरवणूकीसाठी परिसरातील व गावातील लोकांनी सहकार्य केले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.