परंडा : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथील कल्याणसागर शाळे जवळील काशीद मळा येथे आज मंगळवार २३ एप्रील ते २६ एप्रील दरम्यान सलग ४ दिवस दररोज सायं. ६ ते ९ या वेळेत वृंदावन धाम शिष्य कथा प्रवक्ते हभप गणेशानंद शास्त्री यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे व दरवर्षीप्रमाणे रविवारी (२८ एप्रील)सायंकाळी ५ वाजता लाल मारुती मंदीर भव्य रथोत्सव मिरवणुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भव्य महाशिवपुराण कथा मध्ये मंगळवारी महात्म्य चंचुला भगवान शिवलिंग प्रगट्य कथा, यावेळी संत शिरोमणी सावता माळी यांचे वंशज श्रीक्षेत्र अरण ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांच्या हस्ते आरती होणार आहे. बुधवारी सृष्टी वर्णन-भगवान शिव पार्वती विवाह कथा यावेळी प.पु.दत्तस्वरुप आप्पाबाबा महाराज यांच्याहस्ते आरती होणार आहे. गुरुवारी बारा ज्योतिर्लिंग कथा याप्रसंगी गुरुदेव खेलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांच्या हस्ते आरती होणार आहे. तर शुक्रवारी काल्याचे किर्तन व श्रीक्षेत्र तुळजापुर चे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते आरती होणार आहे.
कथेनंतर दररोज ९ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि.२८ एप्रील रोजी सायंकाळी ५ वाजता मंडई पेठेतील लाल मारुती मंदीर येथून रथोत्सव सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी श्रीक्षेत्र चिंचगाव टेकडी चे प.पु. शिवचरनानंद सरस्वती महाराज, श्रीक्षेत्र सोनारी चे महंत योगी शामनाथ बाबाजी महाराज व श्री. संजय महाराज पुजारी, श्रीक्षेत्र सामनगाव चे ह.भ.प. धर्मराज दादा महाराज यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा नागरिक व भाविक भक्तानी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक – सकल हिंदू समाज परंडा तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवमहापुराण कथासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असुन सोमवारी स. ११ वा. पत्रकारांच्या हस्ते व्यासपीठ पुजन संपन्न झाले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.