परंडा, ता.१३ (तानाजी घोडके ) शहरातील सुफी संत हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती यांच्या ७०५ व्या उरुसानिमित्त,उरुस कमिटीच्यावतीने येथील मुख्य मंडई चौकात सुप्रसिध्द शाहिरी लोककला असलेल्या कलगीतुऱ्याचा कार्यक्रमाला सलग दोन दिवस घेण्यात आला. दुरगावाहुन आलेले शाहीर डफावर थाप देत आपली शाहीरी कलेचा अविष्कार सादर करुन विविध सामाजीक संदेश देत समाजजागृती करीत आहेत.
ग्रामीण बाज जोपासत शाहिरीची लोककला असलेल्या कलगीतुऱ्याला अनेक वर्षाची मोठी परंपरा आहे.मागील ३०० वर्षापासुन आखंडपणे कलगीतुऱ्याची परंपरा सुरु असल्याचे शाहीर सांगतात.अनेक वर्षापासुन डफावर थाप देत शाहीर ही कला जोपासुन मनोरंजनातुन सामाजीक संदेश देत आहेत.कलगीतुऱ्याचे डफ,तुणतुणे,टाळ,पेटी,ढोलकी हे पारंपारिक वाद्य.कलगीतुरा म्हणजे शंकर पार्वतीचा संवाद,रंगतदार सामना या कार्यक्रमात तुरेवाल्या शाहिरांनी पुरुषाची बाजु श्रेष्ठ ठरवायची तर कलगीवाले शाहिरांनी स्ञीयांची बाजु मांडायची असा हा सवाल जवाबाचा लक्षवेधी सामना रंगतो.ही शाहिरी कला गात असताना समाजात सध्या सुरु असलेल्या रुढीपरंपरा,शैक्षणिक अज्ञान,अंधश्रध्देवर प्रहार करुन जनजागृती केली जाते.शुक्रवारी थोर शाहीरांनी लिहिलेल्या अध्यात्मिक कवनावरील शाहिरांनी सवाल-जवाबातुन गायन करुन उपस्थितांची मने जिंकली. शाहिरी कलेतुन राष्ट्रीय एकात्मता,जातीय भेदाभेद नाहीसा करणे, स्ञीभ्रुणहत्या,हुंडाबंदी,स्वच्छ भारत अभियान,पाणी आडवा पाणी जिरवा,दारुबंदी, पाणी जपुन वापरण्याचा संदेश,आदि विषयावर शाहीर समाजप्रबोधन करीत आहेत.या कलगीतुरे कार्यक्रमात दुरगावाहुन आलेले कलगीवाले शाहीर बन्सी कांबळे,नंदुभाऊ बन्सी कांबळे,(करमाळा)कल्याण माळी (कार्ला ता.संभाजी लोकरे (भुम) तुरेवाले शाहीर राजु वाघमारे (मोहोळ) शाहीर सुरेश माळी (रोपळे ता.माढा) यांचा समावेश आहे. तर कोरस साथ देणारे ढोलकीवाले, तुनतुनेवाले, टाळवाले,मंजीरी वाजवणारे या कलाकारांचाही समावेश होता.या कार्यक्रमास ग्रामीण भागातील व शहरातुनही नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी उरुस कमिटीचे अध्यक्ष इमरान मुजावर, रफिफ मुजावर,एजाज मुजावर,अब्बास मुजावर,निसार मुजावर,समीर मुजावर ,मलिक मुजावर,सलीम मुजावर पुढाकार घेतला.शनिवारी ता. ११ रोजी सायंकाळी सहा वाजता समारोप करुन आलेल्या सर्व शाहिरांचा तसेच पञकार प्रकाश काशीद जिल्हाउपाध्यक्ष व्हाईस आॕफ मीडिया धाराशिव यांचाही कमिटीच्यावतीने सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी आरपीआयचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे,शब्बीरखाँ पठाण,गायिका गणिता गव्हाळे आदि उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading