कुक्कडगाव येथे भीषण पाणी टंचाई.
देवगांव (बु )प्रतिनिधी दि.9. परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथे पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे दिवसातील दोन ते तीन तास हे पाणी भरण्यासाठी जात आहेत. याचा सर्वात जास्त त्रास हा महिलांना होत आहे प्रशासन मात्र फक्त बघ्याची भूमिका घेऊन गप्प आहे. ग्रामपंचायतने प्रस्ताव दाखल केले आहेत पण ते प्रस्ताव आज ही पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयात पडून आहेत त्याच्यावर तातडीनी कार्यवाही होताना दिसत नाही. उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईंने त्रस्त झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावा लागत आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजना करून गावातील नागरिकांना पाणी पुरवठा हा सुलभ रित्या उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावातील महिला भगिनी व नागरिकांतून होत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.