मुंबई दि.26- लोकसभा निवडणुकिच्या प्रार्श्वभुमीवर रिपब्लिकन पक्षाची महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक येत्या गुरुवारी दि.28 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील द लेडीज क्लब,तारापोरे रोड,दस्तुर शाळे जवळ; कॅम्प पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.रिपब्लिकन पक्षाच्या या महत्वपुर्ण बैठकीस रिपाइंचे राज्यातील केंद्रिय पदाधिकारी आणि राज्यकार्यकारिणीचे प्रमूख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय बैठकीकडे सर्व राजकीय धुरीणांचे,राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या महत्वपूर्ण बैठकीत रिपाइं( आठवले) कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुतीचा घटक पक्ष असताना ही रिपब्लिकन पक्षाकडे जागावाटपात महायतीकडुन दुर्लक्ष झालेले आहे.त्यात भर म्हणुन रिपब्लिकन पक्षाने केलेल्या विरोधाला न जुमानता भाजप ने मनसे ला सोबत घेण्याचा आटापिटा केला आहे.यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्याच्या जखमी मनावर मीठ चोळण्याचा जुलुम भाजप करित आहे.या बीकट परिस्थित राज्यभरात अनेक जिल्हात रिपब्लिकन कार्यकर्त्यानी आपल्या तीव्र भावना समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.रिपब्लिकन कार्यकर्त्यांची भावनिकता ओळखुन ना.रामदास आठवले यांनी तातडीने गुरुवार दि.28 मार्च रोजी रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाचा वाटा किती?तसेच महायुतीत मनसे ला वाटा दिल्यास रिपब्लिकन पक्षाने कोणती वाट धरायची आणि कोणाची वाट लावायची यावर रिपाइं च्या राज्यस्तरीय बैठकीत विचार विनीमय होणार आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात रिपाइं का भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.त्यामुळे रिपाइंच्या राज्यस्तरीय बैठकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दी प्रमुख
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.