परंडा (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सध्या राज्यामध्ये बोगस दिव्यांगाचा सुळसुळाट उघडकीस आलेला आहे. दररोज एखाद्या विभागामध्ये बोगस अधिकारी सापडत आहेत त्यानुसार परंडा येथील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी दिव्यांग पगारी या विभागांमध्ये अनेक दिव्यांगाच्या पगारी चालू आहेत बंद आहेत या संदर्भात चौकशी करण्यासाठी तहसीलदार परांडा मा. माढेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्रात एसटी महामंडळ व विविध शासकीय कार्यालयामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून शासकीय सवलतीचा लाभ घेणारे अनेक दिव्यांग लाभार्थी आहेत.त्यांची चौकशी करावी संशय वाटल्यास त्वरित कार्ड जप्त करावे योग्य ती कार्यवाही करावी किंवा शासनाने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रमाणपत्र पडताळणी करावी. तसेच परंडा तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थी संजय गांधी निराधार मंजूर लाभार्थी यादी दिव्यांग संघटनेला मिळावी जेणेकरून यानुसार बोगस दिव्यांग कोणते व शासनाचा आर्थिक लाभ घेणारे बोगस दिव्यांग यांना आळा बसावा तसेच बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कार्यवाही करावी.अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे जिल्हाप्रमुख तथा अध्यक्ष तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने आदीसह दिव्यांग बांधव यांच्यासह निवेदन देण्यात आले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.