परांडा (माझं गांव माझं शहर) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व डॉ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर प्रा डॉ हरिश्चंद्र गायकवाड तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे प्रा दीपक हुके प्रा अंकुश शंकर प्रा सौ कीर्ती पायघन नलवडे प्रा प्रतिभा माने प्रा सातव प्रा मोरवे आदी उपस्थित होते. यावेळी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या दिनांक 31-12- 2024 च्या संदर्भीय पत्रानुसार महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी यशस्वी सामाजिक अभियान तालुका समन्वयक सौ राखी देशमुख यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात म्हणाले की राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या जीवनात प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होत्या. जिजाऊ त्यांच्या सद्गुवून शौर्य आणि दूरदृष्टीच्या ओळखले जात होत्या. हे गुण त्यांनी शिवरायांना दिले. समान न्याय देण्याशी वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी दिले. तेव्हा विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंचे विचार आत्मसात करावे. अध्यक्षीय समारोप करताना ङाॅ हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले की विद्यापीठाने व महाराष्ट्र शासनाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे. वाचन किती महत्त्वाचे आहे वाचनामुळे प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने जगतो त्याला आपल्या कर्तुत्वाची जबाबदारीची जाणीव होते परंतु सध्याच्या आधुनिक युगामध्ये मोबाईलचे युग आल्यामुळे विद्यार्थ्याकडे व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कडे वाचन करण्यासाठी वेळ नाही त्यामुळे होत असलेले नुकसान हे लक्षात येत नसल्याने अनेकांच्या जीवनात निराश होण्याची वेळ आलेली आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सातवा यांनी केले प्रास्ताविक प्रा कीर्ती नलवडे पायघन यांनी केले तर आभार प्रा खारे यांनी मानले. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.