प्रतिनिधी परंडा (दि .26 )वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक 28 जुलै 2024 रोजी परंडा शहरात येत आहेत आरक्षण बचाव यात्रा या महाराष्ट्रभर काढलेल्या एससी एसटी ओबीसीच्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी आरक्षण बचाव संदर्भात सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत . या आरक्षण बचाव यात्रेमध्ये एससी एसटी ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे एससी एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटी विद्यार्थ्या प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे . एससी एसटी आणि ओबीसीला पदोन्नतीतील आरक्षण मिळाले पाहिजे . अनुसूचित जातीच्या जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणारी आर्थिक मदत बंद आहे ती पूर्वत चालू ठेवावी अशा वेगवेगळ्या मागण्यासह प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी दुपारी दोन वाजता परंडा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे . अशी माहिती पत्रकार परिषदेत मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांनी दिली . या पत्रकार परिषदेसाठी समता परिषद जिल्हाध्यक्ष बिबीशन खुणे प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे ओबीसी नेते तथा जिल्हा काँग्रेस सचिव धाराशिव नितीन गाढवे, मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष अविनाश इटकर ‘ श्रीमंत शेळके जिल्हा युवा उपाध्यक्ष भाजपा शहाजी सोलंकर ओबीसी नेते भारत पवार इत्यादी उपस्थित होते .या पत्रकार परिषदेसाठी फुले आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे तालुका अध्यक्ष तानाजी जाधव तालुका सहसचिव राहुल पवार तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे आदी उपस्थित होते . या पत्रकार परिषदेसाठी परंडा शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading