परंडा, दि. २४ ऑक्टोबर -धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांनी परांडा विधानसभेचा उमेदवारी अर्ज महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे वतीने आज दि. २४ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय भूम येथे जाऊन दाखल केला.
यावेळी भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनाथ जगताप, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, संघटक जयदेव गोफणे, संजय गाढवे, गौतम लटके आदींसह महायुती मधील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये
शिवसेनेकडून ही जागा तानाजी सावंत यांनी लढवली होती आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले होते. तीन वेळा आमदार राहीलेले राहुल मोटे यांचा त्यांनी पराभव केला होता.
सावंत यांना २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून प्रतिस्पर्धी रणजित ज्ञानेश्वर पाटील असणार आहेत तसेच वंचित बहुजन आघाडी करून प्रवीण रणबागुल हे देखील असणार आहेत सावंत हे शेतरस्ते, बोगद्यामधुन उजनीचे पाणी सिना कोळेगाव मध्ये आणणे, तिन्ही तालुक्यात एमआयडीसी मंजूर करणे, आरोग्य विषयक सुविधा, नवीन दवाखान्याच्या उभारण्या, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून केलेली सिंचनाची कामे आशा प्रकारची अनेक कामाच्या माध्यम तुन सावंत रिंगणात उतरले आहेत. राजकीय घडामोडी मध्ये कार्यकर्त्यांनी जोर धरला आहे आता या स्पर्धेत कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.