अनाळा ता . परंडा येथील अंगणवाडी मध्ये पोषण पाककृती आयोजित करण्यात आली होती .यावेळी बीट सुपरवायझर मोमीन , अंगणवाडी सेविका , मदतनीस व महिला .

प्रतिनधी – माझं गांव माझं शहर- दि . २२ परंडा तालुक्यातील अनाळा येथील अंगणवाडी मध्ये अंगणवाडी क्र . १ , २ , ३ यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २१ रोजी एकात्मीक बाल विकास प्रकल्प सेवा योजना अंतर्गत पोषण पाककृती अभियान राबविण्यात आले . प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन अनाळा बीट च्या सुपरवायझर श्रीमती मोमीन यांच्या हस्ते करण्यात आले . पोषण अभियान मध्ये विविध पोषणयुक्त पदार्थ तयार करून त्याची उत्कृष्ठ रित्या मांडणी करण्यात आली होती . गरोदर माता , स्तनदा माता , 0 ते 0३ वर्षे बालके यांना पोषण आहार कसा द्यावा , गरोदर मातानी गरोदर पणात शरिराची काळजी कशी घ्यावी याविषयी श्रीमती मोमीन यांनी महिलांना अनमोल मार्गदशन केले . कार्यक्रमास गरोदरमाता , स्तनदामाता व गावातील महिला उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे उत्तम नियोजन अंगणवाडी सेविका हसीना शेख , वंदना मोरे , एस . एस. जाधव ‘ अंगणवाडी मदतनिस भाग्यश्री पुरंदरे ‘ विमल चौघुले , शारदा थोरात यांनी केले .


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading