परंडा तालुका संगणक परिचालक संघटनेची बैठक पंचायत समिती परंडा येथील सभागृहात अगदी खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी गणेश चोपडे, उपाध्यक्षा सौ.आरती काळे आणि सागर गव्हाणे तर सचिव पदी रावसाहेब काळे यांची एकमताने खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.
परंडा तालुका संगणक परिचालक संघटनेची द्विवार्षिक सर्वसाधारण बैठक पंचायत समिती परंडा येथे संघटनेचे माजी अध्यक्ष विश्वास गुडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सिध्देश्वर मुंडे आणि राज्य कोअर कमिटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यभर सदस्य नोंदणी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने परंडा तालुका संगणक परिचालक संघटनेची बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित सर्व संगणक परिचालक यांचे सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले तर उपस्थित सर्व सदस्याच्या एकमताने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली… यामध्ये परंडा तालुका अध्यक्ष पदी गणेश चोपडे यांची निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्ष पदी सौ.आरती काळे आणि सागर गव्हाणे यांची निवड करण्यात आली तर तालुका सचिव म्हणून रावसाहेब काळे यांची नियुक्त करण्यात आली….
तसेच प्रत्येक सर्कल ला एक सर्कल प्रमुख नेमून त्यांचेवर त्या सर्कलची जबाबदारी देण्यात आली…
यामध्ये शेळगाव सर्कल प्रमुख पदी विकास हगारे, सोनारी सर्कल प्रमुख पदी सुशील कुंभार डोंजा सर्कल प्रमूख पदी कांतीलाल जगताप, पाचपिंपळा सर्कल प्रमुख पदी शशिकांत कोळेकर, तर लोणी सर्कल प्रमुख पदी युवराज ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव व सर्व पदाधिकारी यांचे तालुक्यातील सर्व सदस्यांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तर नवनियुक्त तालुका अध्यक्ष गणेश चोपडे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी मा. अध्यक्ष विश्वास गुडे,गणेश चोपडे,आरती काळे, सागर गव्हाणे, रावसाहेब काळे, विकास हगारे,विनोद झिरपे, बालाजी दौंड, कांतीलाल जगताप, युवराज ढोरे, शौकत पठाण, चेतन जतकर, सागर बुरंगे, सुशील कुंभार, शरद गरड, सज्जन गोडगे, केशव पवार, योगेश नरुटे, नितीन शिंदे, अब्दुल पठाण, नवनाथ डोके, उमेश भागडे, प्रविण रगडे, अक्षय कोटुळे, राहुल हुके, ज्ञानेश्र्वर गव्हाणे, गोविंद बोन्द्रे,कैलास थोरात, तानाजी थोरात, विष्णु खांडेकर यांचेसह तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.