परंडा, दि. २ ( प्रतिनिधी ) धाराशिव येथील पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा येथील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून तहसील प्रशासणा मार्फत निवेदन देण्यात आले .
धाराशीव येथील दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर हे सोमवार दि १ रोजी कार्यालयातील कामकाज आटपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोटार सायकलवरुन घराकडे निघाले असताना धाराशिव ते बेंबळी रस्त्यावर पाच अज्ञात हल्ले खोरांनी तोंडाला रुमाल बांधून केसकर यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत चाकूचा धाक दाखवत भ्याड हल्ला केला . केसकर यांनी मदतीसाठी रस्त्यावरील लोकांना अवाज दिला असता . हल्लेखोर केसकर यांची मोटर सायकल पळून नेहली आणि काही अंतरावर टाकुन दिली. या घटनेचा परंडा व्हाईस ऑफ मिडिया संघटना व इतर पत्रकारांच्या वतीने जाहिर निषेध नोंदवित तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . सदरील आरोपी विरुद्ध पत्रकार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अशा गुंडांचा पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन मुस्क्या आवळ्याव्यात आशी मागणी करण्यात आली .
सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्रकावर हल्ले होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. तरी पोलीस प्रशासनाने या घटनेच्या गांभीर्य पाहून वेळीच कारवाई करावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे . या निवेदनावर मुजीब काझी , प्रमोद वेदपाठक , प्रकाश काशीद , विजय माने , आनंद खर्डेकर , तानाजी घोडके, श्रीराम विद्वत, गणेश राशनकर, संतोष शिंदे , रावसाहेब काळे, सचिन कुलकर्णी, शंकर घोगरे ,फारुख शेख ,विजय मेहेर निसार मुजावर पत्रकार बांधव उपस्थित होते
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.