परंडा ( २३) वीज ग्राहकांची आर्थिक लूट करीत असलेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

परंडा तालुक्यात व शहरातील दिवसांदिवस विस्तार वाढत असल्याने शेतकरी व घरगुती वीज निमित्ताने वीज मीटर बसविणे बाबत मागणी वाढत आहे. असे असताना श्री अनिल अंकोलीकर उपकार्यकारी अभियंता परांडा त्यांच्या सोबत चर्चा करताना असे सांगितले आहे,की परंडा तालुक्यातील अकरा ते साडे अकरा हजार वीज मीटर ना दुरुस्त आहेत, असे त्यांनी त्यांच्या दालनामध्ये आम्हाला तोंडी म्हणणे दिले असून , इतक्या मोठ्या प्रमाणात वीज मीटर बसविणे कसं शक्य आहे ? असे उत्तर देऊन आम्हाला सांगितले. हे उत्तर अकल्पनीय व अपेक्षित नाही.मग, धाराशिव जिल्ह्यामध्ये असे बंद असलेले वीज मीटर किती असतील ? प्रश्न उपस्थित होत आहे.आणि या वीज ग्राहकांना जे विद्यूत महावितरण कंपनीच्या वतीने दिले वीज बिल दयेक दिली जात आहेत. ते सर्व अंदाजे व मोघम स्वरूपात वीज मीटर वरील रिडींग न घेता , मागील वीज वापरावरून अंदाजे आपण का ? ठरवितात. मग अशा पद्धतीने मनमानी बोगस व बनावट कारभार सुरू आहे का ?ग्राहकांना जे वीज मीटर बसविलेले आहेत ते खराब असतील चालत नसतील तर त्याठिकाणी नवीन वीज मीटर बसविणेबाबत आपण संवेदनशील असयला पाहिजे
आपल्या स्तरावरून योग्य ती काळजी घेतली जात नाही हा हलगर्जीपणा व निष्काळजी वृत्ती आहे. ग्राहकास तक्रार दाखल केली तरी त्यांना आपल्या विद्युत महावितरण कार्यालय परांडा कडून वेळेवर सेवा उपलब्ध करून दिली जात नाहीत, यामुळे ग्राहकांना होणाऱा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे अर्थीक लुबाडणूक होत आहे यामुळे ग्राहकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास दिला जात आहे. वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे.

कार्यकारी अभियंता
विभागीय विद्युत महावितरण कार्यालय धाराशिव आपल्या वतीने तात्काळ योग्य ती ग्राहकांना आवश्यक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मागणी करण्यात आली.

अन्यथा याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद व दक्षता घ्यावी सबब निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, परंडा शहर अध्यक्ष श्री नवनाथ कसबे परंडा तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष अजित नुसते यांच्या सह्या आहेत.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading