परंडा (माझं गांव माझं शहर) भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली गुरु शिष्य परंपरा यात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे . गुरु हा उत्पत्ती स्थिती लय याला कारणीभूत असल्याने गुरूला परब्रम्हाची संज्ञा देण्यात आली आहे .मातेच्या उदरामध्ये सर्वांचा जन्म होतोच मात्र गुरूच्या अंतकरणात शिष्याची मूर्ती घडवताना दुसरा जन्म होतो .त्यामुळेच संस्कृतीमध्ये – जन्मनः जयते शूद्रम् । संस्कारात द्विज उच्चते ॥ असे विधान आहे . भारतीय संस्कृतीमध्ये – मात्र देवो भव । पितृ देवो भव । आचार्य देवो भव । आई-वडिलांनंतर गुरुला देवाची संज्ञा दिली आहे . समाजात प्रत्येक व्यक्ती हा आजूबाजूच्या पर्यावरण नातील घटकांकडून विविध गोष्टी शिकत घडलेला असतो .त्यामुळे च्या कडून ज्या गोष्टी आपणाला शिकायला मिळतात त्यांचे समाजाचे ऋण फेडण्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा गुरुपौर्णिमा सण दिवस आपण मोठे भक्ती भावाने साजरा करतो . आज गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ .आनंद मोरे यांच्या मौर्य हॉस्पिटल श्री श्री हॉल येथे -योगा टीचर मेजर श्री शिवाजी गोडगे (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपूजन संपन्न झाले .याप्रसंगी सर्वसाधाकांनी प्रसादासाठी गोपाळकाला करून सर्वांनी प्रसाद ग्रहण करून गुरु विचार व भक्ती संगीताचाआस्वाद घेतला .
गुरूपूजनाचा खरा अर्थ – आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करणं, गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झाले. यासाठी सतत गुरू बद्दल कृतज्ञ असणे. यावेळी योगगुरू शिवाजी आप्पा गोडगे.उद्योजक श्री नागेश काशीद, सौ प्रियंका नागेश , डॉ आनंद मोरे, डॉ रमा मोरे , सौ ज्योतीताई गोडगे, सौ सरोजा यादव, श्री नागेश यादव, श्री . गणेश गायकवाड, उमेश पालके, सचिन भालेकर, किशोर जाधव, दिपक हूके, श्री .अविनाश कुंभार श्री . श्री राजाभाऊ जाधव , सचिन जाधव , संतोष डाके श्री .सुजय डाके ,श्री अमोल गायकवाड, श्री दिलीप मोरजकर श्री किरण कुलकर्णी व इतर महिला व बालगोपाळ उपस्थित होते .


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading